SahyadriGeographic_June2014

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

Me Sahyadri
June 2014
Volume 1, number 3
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Special thanks to all those who helped me during the compilation and field work for the help and guidance including Mr. Ninad Gosavi for his writeup on frogs of sahyadri.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine.
 

 

 
Me Sahyadri – June 2014
 
या सदरात, सह्याद्रीच्या विविध घटकांबद्दल छायाचित्र व माहिती द्वारे तोंड ओळख मांडली आहे.
This journal introduces various elements of Sahyadri through brief information and photographs.
 

 

““ 
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in north western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group".
 
 

 

 
Butterfly Angled Pierrot, Caleta Caleta Hewitson, feeding on the weed, Western ghats, India
 
लहान किटक, माश्या व फुलपाखर यांना आपण नगण्य मानतो. पण हे चिमुकले किटक माणसाला व निसर्गाला अत्यंत उपयोगी काम करतात. वृक्षवेलींच्या पुनर्जीवनासाठी ते मदत करतात. शेतातील पीक असो वा माळरानवरचे गवत, सर्व वृक्षवेलींच्या परागीभवनास वारा व किटक प्रामुख्याने जबाबदार असतात. आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी घातक रासायनिक किटकनाशके बऱ्याचदा धोकादायक किड़्यां व्यतिरिक्त उपयोगी किटकांना मारतात. उपयोगी परागीभवन करणारे किटक मारले गेले तर शेतीचे उत्पन्न कमी होते. चित्रात दाखविल्याप्रमाणे पश्चिम घाटातील एक फुलपाखरु, उत्तर अमेरिकेतुन अपघाताने आलेल्या कॉंग्रेस तणावर फुलातुन खाद्य घेताना दिसत आहे. १९५६ साली हे तण भारतात आयात केलेल्या गव्हाबरोबर उत्तर अमेरिकेतुन आले. या तणामुळे शेतीचे, स्थानिक वनस्पतींचे, मानवी आरोग्याचे नुकसान होते. मनुष्याने केलेल्या अचानक अफरातफरीमुळे मुळता एकत्र नसलेले निसर्ग घटक एकत्र आल्याने निसर्गाचे व मनुष्याचे नुकसान होते.
The significance of the butterflies or insects often is overlooked. The insects lead to the harvesting of nature. Insects help the pollination of the plants. Insects, wind, are the main contributors to the plant pollination. If we disturb the insects, due to pollution of food and water they feed upon (such as use of insecticides which may kill useful insects), eventually it will lead to the lower productivity of the agricultural produce.

In the image below the butterfly from western ghats is seen feeding on the flowers of Parthenium hysterophorus. The plant we commonly call as congress grass. Extremely widespread weed plant first arrived in India in 1956 from North America along with wheat import. A small mistake that time lead to the rapid spread of this weed in India, Australia and parts of Africa. The weed has caused lower agricultural produce, health issues in humans, and the dangerous impact on the native insect and plant species. Such combinations of introduced plant species by human beings with native elements in a given ecosystem, may lead to strange aftereffects often disastrous for mankind.
 

 

 
Bonnet Macaque juvenile, Western ghats, Pune district, India
 
मानव करत असलेल्या अधिवासाच्या विनाशामुळे, शिकारीमुळे व प्रदुषणामुळे खुप वनस्पती, व प्राण्यांच्या जाती लुप्त होण्याचा वेग हजारो पटीने वाढला आहे. आय. यु. सी. एन. संस्थेने विविध जातींच्या अभ्यासावरुन त्यांच्या अस्तित्वाला असलेल्या धोक्याच्या पातळीचा अंदाज मांडला आहे. त्यातल्या त्यात कमी धोका असलेल्या जातींना लिस्ट कन्सर्न असे संबोधले जाते. पण हल्ली होत असलेल्या बेसुमार शहरीकरणामुळे निसर्ग अक्षरश: ओरबाडला जाऊ लागला आहे. त्यामुळे सर्रास आढळणाऱ्या जाती गायब होत आहेत. अधिवासाचा होणारा नाश हे त्याचे प्रमुख कारण आहे. लिस्ट कन्सर्न जाती हळुहळु लुप्त होण्याची शक्यता वाढत आहे. सर्वच प्रकारच्या जातींचे संवर्धन होण्यासाठी, त्यांचा अधिवास टिकणे महत्वाचे आहे.
Human activities such as destruction of habitats, hunting, and the pollution of land and water have driven extinction rate to 1000 times faster than the natural rate. The species have been categorized in to various levels by IUCN based on the level of threat. The species with the least threat are categorized as Least Concern. However recent trends around urban areas indicate that even the species which we consider as least concerned are getting wiped out of the urban regions as their habitats are being destroyed at alarming level around human habitations. Most species live outside protected zones. Little research is done on these species outside the protected zones. It will not be a surprise, if the species with least concern tag quickly appear in threatened species list tomorrow. The protection to natural habitat is key to the protection of species, irrespective of the threat status of the species.
 

 

 
Evergreen forest, Ratangad, Western ghats, India
 
ॲम्फिबिआ म्हणजे उभयचर. उभयचर प्राणी थंड रक्ताचे जीव असतात. बेडुक, गांडुळ हे उभयचर प्राणी आहेत. बेडुक जमिनीवर, जमिनीखाली, झाडांवर, किंवा पाण्यात आढळतात. उर्जेसाठी ते बाह्य उर्जास्तोत्रांवर अवलंबुन असतात. शरीराचे तापमान राखण्यासाठी त्यांच्यात अंतर्गत यंत्रणा नसते. कमीत कमी उर्जेवर जगण्याची त्यांची जीवनपद्धती असते. बहुतांश बेडुक पावसाळ्यात दिसतात. इतर ऋतुंमध्ये ते हायबरनेट अवस्थेत राहतात. त्या काळात त्यांना फारशी उर्जा लागत नाही. पृथ्वीवर अंदाजे ६७८० जातींचे उभयचर प्राणी आहेत. यात ५९७० जातींचे बेडुक आहेत. भारतात अंदाजे ३१० जातींचे बेडुक आढळतात. त्यातील अर्धे बेडुक पश्चिम घाटात आढळतात, सह्याद्रीतील १४० पेक्षा जास्त बेडकांच्या जातींमध्ये ११२ जाती अंतर्जन्य आहेत.(ज्या जाती फक्त सह्याद्रीत आढळतात). या जातींचे वर्गीकरण विविध गटात केलेले आहे.
The term amphibia is derived from Greek meaning “leading a double life”. Amphibians are cold blooded vertebrates typically breeding in water and living on the land. Frogs, toads, caecilians are included under the class of amphibia. The amphibians are the animals which live in terrestrial (on the ground), fossorial (underground) , arboreal (on trees) or freshwater aquatic ecosystems. The amphibians are ectotherm. Ectotherm means the ones who are hot from outside but have little mechanism to control the temperature from inside. They rely on environmental heat sources. Due to this these animals can hibernate and operate at very low metabolic rate. As these amphibians are under hibernation most of the time, they are invisible to the common man. Let us understand about these invisible amphibians.
 

 

 
Raorchestes species (Bush Frog) , Chandoli national park, western ghats, Satara district, Maharashtra, India
 
चला तर समजुन घेऊयात सह्याद्रीतील बेडकांबद्दल, आपला मित्र निनाद गोसावीच्या शब्दांत.
"सह्याद्रीतील जंगले, एक अद्वितीय जैववैविध्यतेचे विश्व आहे. सह्याद्रीमध्ये बेडकांच्या अजब व गुढ जाती आहेत. भारतात आढळणाऱ्या ५० % पेक्षा जास्त जाती सह्याद्रीत आढळतात. येथील बेडकांवर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. बऱ्याच बेडकांबद्दल अजुन संशोधन झालेले नाही. बेडुक अजब प्राणी आहे. तो जमिनीवर, पाण्यात, झाडांवर सुद्धा आढळतो. तो सॄष्टीतील खाद्यशृंखलेतला अत्यंत महत्वाचा घटक प्राणी आहे. ते मोठया प्रमाणात किडे खातात. यामुळे किड़्यांवर नियंत्रण रहाते. कोकणात बेडुक ओरडायला लागला कि पाऊस येणार असा समज आहे. पाऊस झाल्यावर डबक्यांच्या अवतीभवती त्यांचे डराव डुक सुरु होते. एकाच वेळी बरेच बेडुक ओरडु लागले कि त्याला एक वाद्यवृंदाचे रुप येते. शास्त्रज्ञ बेडकांच्या आवाजांचा अभ्यास करत आहेत. वेगवेगळ्या जातींमध्ये मादी वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घालते. काही पाण्यात, काही जमिनीवर दगडाखाली, काही पानांवर, अंडी घालतात. पण बरेच बेडुक लुप्त होण्याचा धोका वाढत आहे. याला अनेक कारणे आहेत. अधिवास, पाण्याची डबकी, दलदल, पाणथळ जागा, गवताळ प्रदेश, जंगले नष्ट होत आहेत. बेडुक त्याच्या आजुबाजुस होणाऱ्या बदलांमुळे प्रभावीत होतो. विविध प्रकारच्या बुरशींमुळे बेडकांना धोका निर्माण झाला आहे. बरेच बेडुक आपल्याला अचंभित करतात. ते सुंदर असतात. आपल्याला त्यांच्या बद्दल फार कमी माहिती आहे. आपण बेडुक लुप्त होऊन देऊ नयेत."
Let us understand what the Sahyadri frogs mean from Amphibian enthusiast Ninad Gosavi,
"Sahyadri , a land of forest , rich in biodiversity. This land has , mysterious variety of frogs. More than 50% species of frog of India are found in Sahyadri hill range. Lots of frogs are still unknown and scientists are working on it. Frogs are the super animals, they can live on land , under water and some species live on trees also. Frogs are one of the important stage in food chain. They eat pest of cultivation and help to control it. Their call is said to be the indicator of rain in most of the villages of Konkan. After first rain of monsoon , some of them gather around small pond and start music concert with their unique call. Scientists are now working on documentation of these calls in western ghats. After breeding , female lay eggs according to habit of species. Some deposit eggs in water , some on land under rocks , some deposit on large leaves and some make nest by folding leaf. But now a days we are loosing these beautiful creatures . Lots of reasons are behind it. Loss of habitat is one of the main threat faced by frogs. Loss of water ponds , marshes , grass lands , forest causes vanishing of these little life. Frogs are very sensitive to their environment , they show change in their body according to the vital changes in their niche. Dermal fungal infection on frogs is also affecting on the population of frogs in Sahyadri. Frogs are beautiful , amazing. We know very little about it. Sahyadri has lots of unknown frogs. We should not loose them. "
 

 

 
Frog genera of western ghats, Western ghats, India
 
पृथ्वीवर अंदाजे ६७८० जातींचे उभयचर प्राणी आहेत. यात ५९७० जातींचे बेडुक आहेत. भारतात अंदाजे ३१० जातींचे बेडुक आढळतात. त्यातील अर्धे बेडुक पश्चिम घाटात आढळतात, सह्याद्रीतील १४० पेक्षा जास्त बेडकांच्या जातींमध्ये ११२ जाती अंतर्जन्य आहेत.(ज्या जाती फक्त सह्याद्रीत आढळतात). या जातींचे वर्गीकरण विविध गटात केलेले आहे.
On our planet there are about 6780 species of amphibians. Out of these frogs account for 5970 species. Out of 5970 species of Frogs on earth, India has about 310 known species of frogs. Out of 310 almost half the species are restricted to western ghats. Out of about 140+ species of frogs of western ghats, 112 are endemic species. Endemic to western ghats means the species which are not seen anywhere on except in western ghats. These species are classified in various families and genera.
 

 

 
Frog IUCN status - western ghats, Western ghats, India
 
इतर प्राण्यांप्रमाणे आय. यु. सी. एन. संस्थेने बेडकांचे वर्गीकरण केले आहे. प्रजातीला असलेल्या धोक्याच्या पातळीनुसार हे वर्गीकरण ठरवण्यात येते. सह्याद्रीत आढळणाऱ्या बहुतांश (४८) जातींच्या बद्दल कमी माहिती उपलब्ध आहे. ५२ जातींचे बेडुक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर ३० जातींचे बेडकांना तुर्तास धोका नाही. (लिस्ट कन्सर्न). बहुतांश जातींचे संशोधन होणे महत्वाचे आहे.
As can be seen in this chart the western ghat frogs can be classified based on their IUCN status. IUCN has ranked the species based on the threat to the species. It is interesting to see here that large number of species are classified as data deficient. It means we do not have sufficient data about the species, particularly about their distribution, numbers, threat data etc. This means there is a huge scope of Research in this field. Also the large pie of frogs are threatened and endangered. Few are least concern species. Most of the non endemic species are least concern species.
 

 

 
Frog endemic status - western ghats, Western ghats, India
 
आलेखात दाखविल्याप्रमाणे बहुतांश जाती अंतर्जन्य आहेत. या जातींचे बेडुक फक्त सह्याद्रीत आढळतात. जगात इतरत्र ते आढ्ळत नाहीत. अगदी अलिकडे शोध लागलेल्या जमिनीखालच्या नासिकाबत्राचुस बेडकावरुन पुन:सिद्ध होते कि भारतीय उपखंड पुर्वी गोंदावन महाखंडाचा भाग होता. याजातींच्या बेडकांचे अफ्रिकेतील बेडकांशी साधर्म्य आहे.
As shown in the chart the most of the species seen in western ghats are endemic. 112 out of 140+ species are endemic. The most of the endemic species are threatened species with some data deficient. The recent discovery of Nasikabatrachus frog, which lives underground has connection with frogs from southern hemisphere. The discovery promotes the theory that India once part of Gondwana super continent got split, isolated and then rammed in to Asia forming Himalaya.
 

 

 
Indrani family frog, Western ghats, Chandoli national park, Maharashtra, India
 
या बेडकांचा माणसाला काय उपयोग ? बेडुक पर्यावरणाच्या शुद्धतेचा प्रमापक आहे. बेडकाच्या सच्छिद्र त्वचेमुळे त्यावर जमिन, पाणी व हवेतल्या होणाऱ्या बदलांचा त्वरित परिणाम होतो. याच प्रमाणे बेडुक खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक प्राणी आहे. तो डासांची अंडी खातो. यामुळे मलेरियासारख्या रोगांवर नियंत्रणासाठी मदत होते. बेडुक वैद्यकिय शास्त्राच्या अभ्यासासाठी वापरला जातो.
But what is the use of frogs to mankind ?. Frogs are considered as the ecological indicators due to their sensitive permeable skin which can detect changes in land, water and air. Where they live. Amphibians play crucial role in the food web as prey and predator. They help us in controlling epidemic diseases such as malaria by feeding on mosquito larvae. Frogs are used in research in medicine field.
 

 

 
Gunther's Indian Gecko (Geckoella Deccanensis), Chandoli national park, western ghats, India
 
सरपटणाऱ्या लहान प्राण्यांमध्ये सरडे, अगामा, पाली, व सापसुरळ्या यांचा समावेश होतो. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप, कासव, मगरी, इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. भारतात एकुण ८० जातींच्या पाली, ६० जातींचे सरडे व ५६ जातींच्या सापसुरळ्या आढळतात.
The small reptiles with legs can be roughly be classified as Lizards and Agamas, Geckos, skinks. The other reptiles include snakes, shieldtails, crocodiles, and turtles. India has about 79 species of Geckos, 59 species of lizards, 56 species of skinks. The image shows the Geckoella Deccanensis species seen in western ghats.
 

 

 
Lord Hanuman, Ratangad fort, western ghats, Maharashtra, India
 
हनुमानाचे बुरुजातले हे शिल्प ठसठशीत आहे. रतनगडावर बुरुजात हनुमान, गणपती, रिद्धी, सिद्धी, नक्षीकाम, जलदेवता अशी सुंदर व देखणी शिल्पे आहेत. आपण हनुमानाचा अवतार म्हणुन माकडे व लंगुर यांना देव मानतो. यामुळे त्यांना संरक्षण मिळते. एखादया प्राण्याला धर्मामुळे मिळणारे संरक्षण फार उपयोगी ठरते.
The lord Hanuman sculpture at Fort Ratangad. In Hindu tradition the monkeys, Langoors are treated as the form of God and hence are treated with care. Though they are not directly threatened, indirectly the habitat is slowly being tempered by human beings.
 

 

 
Wild dog, Maharashtra, India
 
पश्चिम महाराष्ट्राच्या जंगलात, सह्याद्रीत एके काळी खुप कोळसुणी होत्या. हळुहळु हरणे कमी झाली, तसे वाघ, बिबटे व कोळसुणी कमी झाले. पुणे जिल्ह्यात १९३० पुर्वी हे सर्व हिंस्त्र प्राणी होते. आज बिबट्या सोडला तर वाघ, अस्वले, कोळसुणी पुणे जिल्ह्यातुन लुप्त झाले आहेत. कोळसुणी (शिकारी कुत्रे) कळपात रहातात. सातारा जिल्ह्यात व दक्षिणेला ते आढळतात.
The north western ghats once had large number of Indian wild dogs even in the Pune district. Col. Sykes notes show that he had captured and analysed the wild dog from the Bhimashankar forest. Today the wild dogs are seen in Sahyadri and Chandoli parks and further southwards. There are no recent accounts of wild dogs from Pune district and north of it in western ghats. In Marathi these are called as Kolsun. They are in pack and are very aggressive when it comes to hunting.
 

 

 
Man Versus Wild, Plastic pollution at Bhairavgad, Chandoli national park, Western ghats, Maharashtra, India
 
एखाद्या जंगलात शहरी माणुस गेला तर तो आपल्याबरोबर स्वत:च्या सोयीसाठी बऱ्याच वस्तु घेऊन जातो. प्लॅस्टिक च्या बाटल्या/पिशव्या, काचेच्या बाटल्या, थर्मोकोलचे पेले, ताटल्या, कागद, वर्तमानपत्र, माचिस, चुन्याची पाकिट, चुईंग गम, इत्यादी अशी न संपणारी यादी आहे. बहुतेक सर्व ट्रेकर्स असा कचरा जंगलात टाकतात. देऊळ असेल तर त्यात उदबत्यांची पाकिट, नारळाच्या शेंड़्या, कोंबड़्यांची पिसे यांची भर पडते. काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हा कचरा कोण साफ करणार ?. मुळ:त: कचरा करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे सर्वांना वाटते. अशा कचऱ्यामुळे होणारी वन्यजीवसॄष्टीची हानी बहुतांश शहरी व ग्रामीण माणसाला उमजत नाही. याला अज्ञान कारणीभुत आहे. अत्यंत संवेदनशील अधिवासांत माणसाच्या पायातील वहाणांच्या बरोबर जाणारी धुळ/त्यातले तणाचे बी धोकादायक होऊ शकते.
The plastic pollution seen in Urban areas have created the menace in rural and forested regions due to lack of mechanisms to clear the pollution. Often the famous tourist locations, religious or eco-sensitive or both, are polluted due to human activities. Often the lack of funds is the reason why the pollution prevention and control is missing. A local mechanism of generating funds and taking actions both preventive and post-pollution are important. Recent actions taken by Maharashtra state forest department at some locations such as Bhimashankar Wild life Sanctuary has shown visible improvement in reducing plastic pollution there. Strict regulations, laws and control mechanisms is a way ahead to tackle this issue. Education and awareness of locals and tourists though is a long-term proposition, government actions can resolve the pollution issue in a short duration.
 

 

 
Endemic threatened bird of western ghats, Nilgiri wood pigeon, Pune district,Western ghats, India
 
सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात रहाणारा एक अत्यंत महत्वाचा पक्षी आहे, निलगिरि वूड पिजन. याला मराठीत रानकवडा असे म्हणतात. मोठया आकाराचे हे कबुतर शिकारीमुळे व अधिवास नाहीसा होत असल्यामुळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. उंच झाडांवर आढळणारी ही कबुतरे लाजाळु असतात. उंच झाडांची गच्ची हे त्यांचा अधिवास होय. आय. यु. सी. एन. संस्थेच्या यादीत या पक्ष्याला "थ्रेटंड" असे म्हणले आहे. तो सह्याद्रीतला अंतर्जन्य पक्षी आहे.
One of the important endemic birds of western ghats, Nilgiri wood pigeon is categorized as Threatened bird species as per IUCN list. It is a large sized bird (30 cm). The large trees in evergreen forest and its canopy is its habitat. These birds are good indicators of dense evergreen forest.
 

 

 
Black bulbul, western ghats, Maharashtra, India
 
सह्याद्रीच्या सदाहरित जंगलांच्या झाडांच्या माथ्यावर रहाणारा व क्वचितच खाली जमिनीवर येणारा पक्षी आहे, काळा बुलबुल. हे काळे शिडशिडे बुलबुल, जंगलात ग्रुप मध्ये रहातात. त्याच्या डोक्यावरचे पिस उभी असतात.
The Indian black bulbul is seen in evergreen forest canopies in western ghats. The birds are seen in groups and seldom come down the canopy.
 

 

 
Cave temple, Amba-Ambika caves,Junnar, Pune district, Western ghats, India
 
जुन्नर जवळ अंबाअंबिका लेणी आहेत. येथे जैन शिल्पे आहेत. लेण्यात बरेच शिलालेख आहेत. मुळ लेणी बौधकालीन आहेत. येथील चैत्यगृहाचे काम अर्धवट आहे. बहुदा कोरिव काम करताना डोंगरात भेग आढळली. त्यामुळे काम अर्धवट सोडले असावे असा तर्क आहे. देवीची पुजाअर्चा होते.
The Amba-Ambika caves have ancient carvings which are considered to be Jain caves. The godess in the caves is worshipped by locals. The caves are located in Manmodi hills near Junnar in Pune district.
 

 

 
Bhut Ling Caves, Junnar, Pune district, western ghats, India
 
The mysterious Bhut caves are located in a hill south of Junnar. These caves are left unfinished due to the rock defect in the caves, which probably lead to the water leakage. The entrance of the caves has this beautiful sculpture above the main entrance opening.
जुन्नरच्या अंबा अंबिका लेण्यांजवळ अजुन एक लेणी आहे. त्याचे नाव आहे, भुत लेणी किंवा भुतलिंग लेणी. लेणीमधला चैत्य अर्धवट काम केलेला आहे. डोंगरातल्या भेगेमुळे काम अर्धवट सोडले असावे असा तर्क आहे. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वावर हि कोरलेली सुंदर कमान शिल्प आहेत. चित्रात हत्ती, फुल व मनुष्याची चित्रे आहेत
 

 

 
Grass and its dependent scally breasted Munia, Western ghats, India
 
. या लहान मुनिया, गवतावर जगतात. एखाद्या लहान झाडावर किंवा झुडुपावर ते आपले घरटे पावसाळ्यात करतात. गवताचे पाते घेऊन हा पक्षी उडताना दिसतो तेंव्हा गवत उडत आहे असे वाटते. गवताचे बी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. गवत नसेल तर मुनिया जगु शकेल का ? मुनिया प्रमाणे गवतावर अवलंबुन असणारे बर्च पक्षी, प्राणी व किटक असतात. मोठया झाडांप्रमाणे गवत फार उपयोगी व महत्वाचे असते. आपण जो भात, गहु, ज्वारी खातो ते गवताचेच प्रकार आहेत.
These small scally breasted Munias are seen busy carrying grass to build their nests in early monsoon season. They pick up the grass and fly, giving an impression that the grass is flying. These birds feed on grass seeds. They almost live with grass.
 
 
 
.
Thank you.
 


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions.